जिल्हा
मुरबाडची मृगाक्षी राणे जाणार इस्त्रोला
जिल्हा परिषदेच्या मिशन भरारी परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम
मुरबाड: ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची संकल्पना असलेला मिशन भरारी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत इ.५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांची केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तर अशी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत यशस्वी गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्हा परीषद ठाणेमार्फत इस्रो येथे सहलीत सहभाग व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या परीक्षेत मुरबाड तालुक्यातील जि.प.शाळा म्हसा येथील सहावीतील विद्यार्थीनी शिक्षक कन्या मृगाक्षी राणे हिने ९५टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मृगाक्षीचे आई वडील नितीन राणे आणि अर्चना राणे हे दोघे जि.प.शाळा बोरीवली येथे शिक्षक आहेत. आपल्या मुलीला जिल्हा परीषदेच्याच शाळेत शिक्षण देऊन त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अल्पावधीत आपल्या कष्टाने त्यांनी बोरीवली शाळा नावारुपाला आणली आहे. भरारी परीक्षेतील यशाबद्दल मृगाक्षीचा तालुक्यातून गौरव होत आहे.
तिला प्रेरणा देणारे मुरबाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, तसेच तिला मार्गदर्शन करणारे म्हसा शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण घागस, प्रकाश म्हाडसे, नितीन घागस, शिवाजी राऊत, श्रीमती घरत, दीपक हिंदुराव शिक्षक आणि पालकांचेही तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600