जिल्हा
नगरपालिकेचे सुरक्षारक्षक शेलवले झाले वकील
नगरपालिकेचे सुरक्षारक्षक शेलवले झाले वकील
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सुरक्षारक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय शेलवले नोकरी करून एलएलबी पदवी परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी शेलवले यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
ॲड. शेलवले अंबरनाथ नगरपालिकेत सुरक्षारक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे यांच्यातर्फे कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून गेली 10 वर्षापासून सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेचे कर अधिक्षक नरेंद्र संख्ये यांनी देखील ॲड.शेलवले यांचा सत्कार केला. सुरक्षा विभागातील किशोर फुलोरे, काशिनाथ भोये, किशोर भोर, प्रशांत सज्जनवार, जगदीश तुपे, अजय आंग्रे इत्यादी सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600