जिल्हा

दुकानाचे फलक फोडण्यापुर्वीच मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

उल्हासनगर: न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या पाट्या सप्टेंबर महिन्यापासून मराठीत लावणे बंधनकारक होते. मात्र उल्हासनगर शहरातील अनेक दुकानदारांनी न्यायालयाचा हा आदेश फाट्यावर मारत आपल्या दुकानांवरील पाट्या मराठीत केल्या नाहीत. या विरोधात उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले. 
 
दुकानांवरील नामफलक मराठीत लावण्याचे न्यायालयाचे आदेश आल्यानंतर उल्हासनगर महापालिकेत मनसे पदाधिकारी, व्यापारी आणि पालिका आयुक्त अजीज शेख यांच्यात एक बैठक पार पडली होती. ज्यात उल्हासनगर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानावरील फलक हे मराठीत करण्यासाठी २६ जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु उल्हासनगर शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानांचे नामफलक मराठीत न केल्याने आज मनसेने उल्हासनगर कॅम्प नंबर ३ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्याचे ठरवले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानावरील पाट्या मराठीत झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे, प्रदीप गोडसे, मैनुउद्दीन शेख, शैलेश पांडव, रवी पाल, सागर चौहान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र दुकानांचे फलक फोडण्यापुर्वीच पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेच्या तब्बल २६ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600