देश-विदेश
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
शरद पवार गटाचे नाव ठरले
नवी दिल्ली : पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळाले आहे. शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव दिले असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही तीन नावे दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिले आहे.
शरद पवार यांच्या जुन्या आणि नवीन पक्षाच्या नावात राष्ट्रवादी हे नाव असून नवीन नावात शरद पवारांचे स्वतःचे नाव दिसून येत आहे. त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा निर्णय लवकरच लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600