जिल्हा

नवी मुंबई स्विकृत नगरसेवक निवडणुकीला आव्हान देणार

नवी मुंबई स्विकृत नगरसेवक निवडणुकीला आव्हान देणार
नवी मुंबई स्विकृत नगरसेवक निवडणुकीला आव्हान देणार फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीत केवळ राजकीय पक्षांनी दिलेल्या नावांचा विचार करून नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र यासाठी आलेल्या इतर अर्जांचा विचार न केल्याने या निवडीला आता सुनिल चौधरी यांच्याकडून न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका नामनिर्देशित पदासाठी वृत्तपत्रातील नोटिसनुसार नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड होण्यासाठी सुनील चौधरी यांनी रीतसर अर्ज दाखल केला होता. २० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्त कार्यालयाकडून सभागृहास सादर करण्यात आलेल्या लिफाफ्यातील यादीप्रमाणे शिफारस केलेल्या सर्व व्यक्तींची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे राजकीय पक्षांव्यतिरिक्त आलेल्या अर्जाचा विचार का नाही केला गेला?, इतर अर्ज कोणत्या निकषावर बाद केले? याची सविस्तर माहिती चौधरी यांनी मागितली आहे. ही माहिती प्राप्त होताच ॲड.असीम सरोदे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील चौधरी यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600