जिल्हा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरोड्रोम परवाना प्राप्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरोड्रोम परवाना प्राप्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एअरोड्रोम परवाना प्राप्त फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात असून विमानतळाच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या विमानतळाला डीजीसीएने मंगळवारी अधिकृतपणे एअरोड्रोम परवाना दिलेला आहे. त्यामुळे सदर विमानतळावरून विमानांना उड्डाण भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एरोड्रोम परवाना हा एखाद्या विमानतळासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिलेला एक अधिकृत परवाना असतो, जो प्रवासी किंवा मालवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असतो. या परवान्याद्वारे विमानतळाची धावपट्टी, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम आणि इतर पायाभूत सुविधा मानकांनुसार असल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच हे प्रमाणपत्र दिले जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ रोजी हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने या विमानतळावरून मालवाहू आणि प्रवासी विमानांना उड्डाण भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600