जिल्हा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणातील त्रुटी दूर करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन ठाणे: लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणातील, राज्य अथवा केंद्रातील त्रुटी दूर करुन लवकरच नामकरणाची प्रक्रिया पार पाडणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांना दिले आहे. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाने मंजुर केला आहे. अद्याप त्याची अमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेऊन नामकरणातील प्रक्रिया त्वरित सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नामकरणातील राज्य सरकारच्या त्रुटींची माहिती घेऊन ती त्वरित दूर करु. तसेच केंद्र सरकारच्या त्रुटी असतील तर त्या दूर करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल आणि नामकरण लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल,असे ना.एकनाथ शिंदे यांनी दशरथ पाटील यांना आश्वासित केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600