जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
डाॅ.जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसेच गाडीचा दरवाजा उघडून डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पहात असताना गोपीचंद पडळकर यांनी शिविगाळ केली. या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी घोषणा देत पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारले.
या आंदोलनात साबिया मेमन, राजेश कदम, राजेश साटम, विक्रांत घाग, रचना वैद्य, माधुरी सोनार, आदी सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600