महाराष्ट्र

कोपरीतील झाडांवर पॅगोडा मुंग्यांनी बांधले घरटे

ठाणे : ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरावरील (विसर्जन घाट) भागात ठाणे महापालिकेने परिसराचा कायापालट करण्याचा ‘विडा’उचलला असतानाच तेथील बहर आलेल्या झाडांवर ‘पॅगोडा अँट’ जातीच्या मुंग्यांनी चक्क घरटे बांधल्याचे आढळून आले आहे. लाळ, माती आणि पानांच्या चु-याच्या मदतीने ‘पॅगोडा’ आकाराचे घरटे या मुंग्यांनी तयार केले आहेत. ते एवढे मजबूत असते की उन-वारा-पावसाचा या घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही, अशी मौैलिक माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली. ‘ठाणे पूर्व’ची चौपाटी म्हणून चेंदणी कोळीवाडा बंदर (विसर्जनघाट) ओळखले जाते. ‘पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्या ठिकाणी निसर्गाचे अनोखे जग बघायला मिळते. अशातच महापालिकेने या ठिकाणी ‘स्मार्ट सीटी’अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. शोभेची झाडे-फुलझाडे यासोबत मोठे वृक्ष विकसित केले आहेत. त्यामुळे सकाळच्यावेळी अनेक पक्ष्यांचा मधूर किलबिलाट, साप, मुंगूस, घोरपडी यांसारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात. अशातच एका झाडावर ‘पॅगोडा अँट’ मुंग्यांचे झाडावरील घरटे लक्ष वेधत आहे. या पॅगोडा अँट मुंग्यांचे विश्व वेगळे आहे. सर्वसाधारण मुंगी वारूळ, भिंत, लाकडाच्या पोकळीत आपले जीवन व्यतीत करतात. परंतु, पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यातच असते. घरट्यांची रचना पॅगोडा पद्धतीची असते. घरटयात असंख्य कप्पे असून हजारो मुंग्या गुण्या गोविंदाने रहातात. त्यांच्या घरटयावर उन-पाऊस व थंडीचा कोणताही परिणाम होत नाही. आपल्याकडे दिसणा-या मुंग्यांपेक्षा, या मुंग्या थोड्या मोठ्या असतात. ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ रहाते. जगभरात सर्वच देशांत मुंग्यांचे अस्तित्व असून, सुमारे १२ हजारांहून अधिक मुंग्यांच्या जाती आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे लाल आणि काळया रंगाच्या मुंग्या आढळतात. यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात. जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना, काहीवेळा नकळतपणे वृक्षावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणा-या ‘पॅगोडा अँट’ जातीच्या मुंग्या सर्वांचे लक्ष वेधतात, असे युवराज गुर्जर यांनी सांगितले. पॅगोडा अँट या मुंग्यांच्या संपर्कात आल्यावर ही मुंगी कडकडून चावते. पण सुतारपक्षी याला अपवाद आहे. सुतार पक्षी (वूडपेकर) हा झाडाच्या ढोलीत पिल्लांचे पालनपोषण करत असला तरी काहीवेळा तो ‘पॅगोडा अँट’ या मुंग्यांच्या घरट्यात आपली पिल्ले ठेवतो, अशी माहिती ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600