जिल्हा

न्यू इंग्लिश स्कूलचा शतक महोत्सव समारोप सोहळा १५ जून रोजी

न्यू इंग्लिश स्कूलचा शतक महोत्सव समारोप सोहळा १५ जून रोजी
न्यू इंग्लिश स्कूलचा शतक महोत्सव समारोप सोहळा १५ जून रोजी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राम मारुती रोड ठाणे या ऐतिहासिक शाळेचा शतक महोत्सवी समारोप सोहळा तसेच इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, ठाणे पूर्व या शाळेचा सुवर्ण महोत्सव सोहळा सोमवार, १५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. १९२६ साली संस्थापक कै. वामन नारायण भोळे सर यांनी सुरू केलेल्या या शाळेने गेल्या शंभर वर्षांत शिक्षण, संस्कार व गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा जपत हजारो विद्यार्थी घडवले असून ते देश-विदेशात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. 'लाईफ इज वर्क' या ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेने सातत्याने प्रगती साधली आहे. या शतक महोत्सवी वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २३ इंटरस्कूल व संस्था अंतर्गत शाळांच्या स्पर्धा, भव्य रॅली व शतक महोत्सव उद्घाटन, माहितीपट निर्मिती तसेच माजी विद्यार्थी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार तसेच शाळेचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, भाजपा शहराध्यक्ष संदीप लेले, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात 100 वर्षांचा गौरवशाली इतिहास” या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास शाळेचे माजी विद्यार्थी, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या दोन्ही शाळांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600