जिल्हा

रामभक्तांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे मीरारोडमध्ये

भाईंदर: मीरारोड येथील रामभक्तांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मीरारोड येथे पिडीतांच्या कुटुंबाला धीर दिला तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर शांती गार्डन येथील भाजपा कार्यालयात बोलताना त्यांनी नयानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला इशारा दिला. शहरातील ३५ मुलींचे धर्मांतरण झाल्याचे सांगत नयानगर पोलीस निरीक्षकाची बिर्याणी जिरली असेल तर येत्या विधानसभा अधिवेशनात आम्ही त्याला दाखवून देऊ. मग कोण जिहादी तुला वाचववायला येतो, ते पाहतो. शहरातील हिंदू बांधवांनी घाबरण्याचे कारण नाही. यापुढे हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्ही इथे येऊन तमाशा करु, असा इशारा दिला. आ. नितेश राणे यांच्यासोबत आमदार गिता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता आणि अनेक भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600