जिल्हा
एनएमएमटी बसेस निवडणुकीच्या कामाला
एनएमएमटी बसेस निवडणुकीच्या कामाला
फोटो: ठाणे वैभव
काही मार्गावरील बस सेवेवर होणार परिणाम
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक कामासाठी परिवहन उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवार १४ जानेवारी सकाळी व १५ जानेवारी रोजी दुपारी बस संचलन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
काही बसमार्गावरील प्रवासी बससेवा बंद करण्यात येणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रवासी जनतेस होणाऱ्या गैरसोयीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रम दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवासी जनतेने नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600