महाराष्ट्र
आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सची छेडछाड
कल्याण : आसनगावला राहणाऱ्या टिटवाळ्यामध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये नर्सचे काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सची आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड केल्याची घटना घडली आहे.
टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात असताना रेल्वे स्टेशवरच नर्स सोबत अश्लील वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 2 वर लोकलची वाट पाहत असलेल्या नर्सला अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश गायकवाड या नराधमाने केल्यामुळे आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600