महाराष्ट्र

ओबीसी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

ठाणे : मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे होर्डींग विना परवानगी लावल्याप्रकरणी महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार ओबीसी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ओबीसी प्रतिष्ठानतर्फे उद्या मंगळवारी मासुंदा तलाव परिसरात शिव प्रदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी जाहिरातीचे फलक आणि होर्डींग लावण्यात आले आहेत. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर देखील प्रतिबंधित क्षेत्रात होर्डींग लावण्यात आले होते. हे होर्डींग विना परवाना लावण्यात आल्याची तक्रार उथळसर प्रभाग समितीच्या कार्यालयीन अधिक्षक सुनीता सातपुते यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५, सेक्शन तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठामपा आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुद्ध कारवाया करण्यात येत असून यापुढेही या कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती सुनीता सातपुते यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600