जिल्हा
३ फेब्रुवारीला मीरा-भाईंदर महपौर पदावर शिक्कामोर्तब
भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने या निवडणुकीत कोणत्या महिला नगरसेविकेला महापौरपद मिळेल, याची सगळीकडे उत्सुकता आहे. महानगरपालिकेतील एकूण ९५ नगरसेवकांपैकी भाजपकडे ७९ जागा असल्यामुळे महापौर भाजपचाच होणार हे निश्चित झाले आहे. महापौर निवडीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
महापालिका प्रशासनाने नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. महासभेच्या सभागृहाचे नूतनीकरण आणि महापौर, उपमहापौर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनांच्या सजावटीचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेची मुदत २०२२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर सुमारे साडेतीन वर्षे या दालनांमध्ये पदाधिकाऱ्यांची प्रतिक्षा सुरू होती. महापौरपद कोणत्या महिला नगरसेविकेला मिळणार? याकडे राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600