जिल्हा

अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस शिपायाच्या कुटुंबाला विम्याचे एक कोटी!

ठाणे : अपघातात मृत्यू झालेल्या ठाण्यातील पोलीस शिपायाच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे विम्याचे एक रुपये मिळाले आहेत. घनश्याम गायकवाड असे मृत झालेल्या पोलीस शिपायाचे नाव असून ते नौपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी कंटेनरच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. घनश्याम गायकवाड हे कर्तव्यावर असताना १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास नितीन कंपनी पुलाजवळ एका भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घनश्याम यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पोलीस दलातही त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जात होता. दरम्यान, ठाणे पोलिसांनी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची वेतन खाती एचडीएफसी या बँकेत सुरु केली होती. त्यावेळी बँकेसोबत एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार दलातील कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्यास बँकेकडून कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळणार आहे. पोलीस शिपाई घनश्याम यांच्या निधनानंतर पोलीस दलाने विमा दावा बँकेकडे सादर केला होता. बँकेतील अधिकाऱ्यांनी तातडीने हा दावा मंजूर केला. त्यामुळे अपघातातील विमा रकमेतील एक कोटी रुपयांचा धनादेश घनश्याम गायकवाड यांची आई मंगल गायकवाड यांना ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या हस्ते देण्यात आला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600