महाराष्ट्र

फ्लॅटमध्ये आग लागून एकाचा मृत्यू

ठाणे : ठाण्यातील तुळशीधाम भागात 27 मजली इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे समोर आली. या आगीत घरात अडकलेल्या एका 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अरुण केडीया, (47) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ठाण्यातील तुळशीधाम परिसरातील कृष्णा सोसायटी या 27 मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम नंबर 405 या फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे 3च्या सुमारास घडली. आग लागलेल्या फ्लॅटमध्ये एकाच परिवारातील एकूण पाचजण अडकले होते. मात्र त्यातील चारजण सुखरूप बाहेर पडले. तर अरुण केडीया हे घरात अडकले होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान फायर व रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. ही आग एका तासाच्या परिश्रमानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यानंतर आग लागलेल्या घरात अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना त्वरित नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या आगीच्या घटनेत घरातील संपूर्ण सामान जळून गेल्याने मोठे नुकसान देखील झाले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600