जिल्हा
खासदार क्रीडा संग्रामात एक लाख खेळाडू घेणार सहभाग
खासदार क्रीडा संग्रामात एक लाख खेळाडू घेणार सहभाग
फोटो: ठाणे वैभव
* माजी कसोटीपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती
* खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती दिली जाणार
ठाणे: कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे.
येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारीगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात एक लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडासंग्राममध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल, असे ते म्हणाले.
या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले.
खासदार क्रीडासंग्राम महोत्सव
* कालावधी: १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५
* ठिकाण: अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारीगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे आयोजन होणार आहे.
* इनडोअर खेळ: बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम.
* आऊटडोअर खेळ: ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर.
* पारंपरिक खेळ: पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600