जिल्हा
ऑनलाईन धर्मांतर: मास्टरमाईंड अलिबागमधून ताब्यात
ठाणे: ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सुमारे ४०० हिंदू मुलांचे धर्मांतर करणाऱ्या मुंब्रा येथील मास्टर माइंड आरोपीला मुंब्रा पोलिसांनी अलिबाग येथे जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील सत्य बाहेर पडणार आहे.
शाहनवाज मुकसूद खान (२३) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गजियाबाद येथे धर्मांतर बंदी कायद्यानुसार दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात शहनवाज खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गजियाबाद येथील पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी मुंब्रा येथे आले होते, परंतु तो त्यांच्या हाताला लागला नव्हता. तेव्हापासून तो फरार होता. त्याचा मुंब्रा पोलीस देखील शोध घेत होते. मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कुंभार यांच्या पथकाला शहनवाज वरळी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्या ठिकाणी पोहचले, परंतु तो तेथे सापडला नाही. तो अलिबाग येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लॉज आणि हॉटेलची तपासणी करत असताना एका लॉजमध्ये आरोपी शहनावाज सापडला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
धर्मांतर झालेला तरुण आणि शहनावाज हे २०२१ला ऑनलाईन fort night या अप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्कात आले होते. त्यानंतर ते विविध ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. शहनवाज याने त्याला झाकीर नाईकच्या भाषणावर देखील चर्चा झाल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले. त्याला गजियाबाद पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600