जिल्हा

टीएमटी वाहकावर प्रवाशाचा हल्ला

टीएमटी वाहकावर प्रवाशाचा हल्ला
टीएमटी वाहकावर प्रवाशाचा हल्ला फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाण्यातील सिडको बसस्थानकावर महिला प्रवेशद्वारातून बसमध्ये चढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका प्रवाशाने टीएमटी बस वाहकावर हल्ला केल्याची घटना घडली. या मारहाणीत वाहकाच्या डोळ्याखाली दुखापत झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण, आंबिवली येथे राहणारे सुरेश राठोड (४५) हे २०१७ पासून ठाणे महानगरपालिकेच्या टीएमटी सेवेत वाहक म्हणून कार्यरत आहेत. १३ जुलै रोजी ते आनंदनगर आगारातून चालक कैलास शरणागत यांच्यासोबत ड्युटीवर होते. रात्री ९.५० वाजताच्या सिडको-पूर्णा फेरीसाठी बस सिडको बसस्थानकात उभी होती. प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने सुरेश राठोड यांनी महिला प्रवाशांना पुढील दरवाजातून, तर पुरुष प्रवाशांना मागील दरवाजातून बसमध्ये चढण्याचे आवाहन केले. त्याचवेळी एक पुरुष प्रवासी महिलांच्या गर्दीतून पुढील दरवाजाने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. राठोड यांनी त्याला मागील दरवाजाने जाण्यास सांगितल्याने तो संतापला. वाद वाढताच संबंधित प्रवासी शिवीगाळ करत राठोड यांच्या अंगावर धावून आला. दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आरोपीने चापट मारून तसेच उजव्या हाताने तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्याच्या बोटातील अंगठी लागल्याने राठोड यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम होऊन रक्तस्राव झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघांनाही ठाणेनगर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने त्याचे नाव नितीन तलासकर (४५) रा. काल्हेर, भिवंडी) असे सांगितले. यावेळी कर्तव्य बजावत असताना टीएमटी वाहकावर हल्ला केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी नितीन तलासकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600