जिल्हा
दिवा शहराचा सुनियोजित विकास करणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे : दिवा शहराचा सुनियोजित विकास करायचा आहे. त्यासाठी ठाण्याप्रमाणेच इथेही क्लस्टर योजना राबवली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन यांनी केले.
दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिवा शहराने मला दिलेला शब्द पाळला. मीही निधीसाठी कुठेही कमी पडू दिले नाही. आज 610 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आणखी मागण्याही करण्यात आल्या आहेत. त्यालाही निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी पाच कोटींचा निधीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केला. तसेच, जागा निश्चित करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. दिवा शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यास खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवा-पलावा सिटी कंपाऊंड ते दिवा आगासन चौकापर्यंत एकूण ३.८५ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी आणि पाणी योजना २४० कोटी, साबेगाव येथील महापालिका शाळा क्रमांक ८०, दिवा-आगासन रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरण(१३२ कोटी), दिवा येथील मास्टीक, युटीडब्ल्यूटी आणि कॉंक्रिटीकरण झालेले रस्ते यांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, आगासन गाव ते कल्याण रस्ता येथे देसाई खाडीवरील पूल, बेतवडे गावातील आगरी, कोळी आणि वारकरी भवन (१५कोटी), खिडकाळी, देसाई, दातिवली या तलावांचे सुशोभीकरण (२२ कोटी) आणि रस्त्यांची कामे यांचे भूमिपूजनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600