जिल्हा
मांडा पश्चिम परिसरात मोठे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
मांडा पश्चिम परिसरात मोठे झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : मांडा टिटवाळा पश्चिम येथील माऊली कृपा परिसरात मोठे झाड वीजवाहिनीवर कोसळल्यामुळे वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे.
या घटनेत लघुदाब वीजवाहिनीचे तीन पोल पडले असून, वीज लाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच परिसरातील ट्रान्सफॉर्मरही नादुरुस्त झाला आहे. या तांत्रिक अडचणीमुळे माऊली कृपा बिल्डिंग, आझाद नगर, संतोषी माता चाळ, एकवीरा कॉलनी, पंढरीनाथ भोईर चाळ व आसपासच्या भागांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
महावितरणच्या मांडा ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता यांनी कळवले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार तांत्रिक दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600