जिल्हा

प्रल्हाद नाखवा कुशल स्पर्धा समन्वयक-अभय हडप

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आणि असोसिएशनच्या मान्यतेने यंदाच्या 2022-2023 या क्रीडा वर्षात सुमारे पाऊणशे स्पर्धेचे आयोजन मुंबईसह ठाण्यात करण्यात आले. या स्पर्धांचा समन्वयक म्हणून काम बघताना अनेक समस्या येतात. पण 'ठाणेवैभव' स्पर्धेच्या समन्वयक म्हणून प्रल्हाद नाखवा यांच्या गेल्या अडीच दशकातील कार्याचा मुंबई क्रिकेट संघटनेला अभिमान वाटतो. या समारंभात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी खास मी आणि माझे कार्यकारिणी सहकारी कौशिक गोडबोले आज ठाण्यात आले आहोत, असे मनोगत अभय हडप यांनी व्यक्त केले. 'ठाणेवैभव'चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ म्हणाले की ठाणेवैभव करंडक स्पर्धा कार्यकर्त्यांचा सत्कार मुंबई क्रिकेट संघटनेकडून प्रथमच होतोय, ही स्पर्धेसाठी अभिमानाची बाब आहे. सत्काराला उत्तर देताना प्रल्हाद नाखवा म्हणाले, क्रीडा कार्यकर्ता म्हणून माझ्या जडणघडणीत माझे गुरु प्रभाकर गुजराथी आणि संपादक नरेंद्र बल्लाळ यांचे योगदान आहे. त्यांना हा गौरव मी अर्पण करतो.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600