जिल्हा
अजित पवार गटाचे प्रकाश बर्डे शरद पवार गटात
अजित पवार गटाचे प्रकाश बर्डे शरद पवार गटात
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्यासोबत गेले होते. आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. प्रकाश बर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुले, सचिन हणुमंते, रमेश संकपाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग, विकेश यादव, संजय पवार, रामचंद्र यादव, सर्वेश कुमार, मीराज खान, शुभांगी बाबर वार्ड, रेखा झा, नीलम विश्वकर्मा, मौशीना खान, मीरा पाठक, भाग्यश्री जाधव, सुमन मिश्रा आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन आदी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600