जिल्हा

भविष्य निर्वाह निधीची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर

भविष्य निर्वाह निधीची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर
भविष्य निर्वाह निधीची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर फोटो: ठाणे वैभव
तीन हजार कर्मचाऱ्यांना फायदा ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने भविष्य निर्वाह निधीची संगणकीकृत प्रणाली अद्ययावत केली असून या सुविधेमुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या ३४६१ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती आता काही क्षणांत मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषद ठाणेने भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनाच्या संगणकीकरणाची सुरुवात सन २००९-१० मध्ये सर्व्हर बेस्ड सॉफ्टवेअरद्वारे केली होती. त्यानंतर २०१८-१९ मध्ये ही प्रणाली वेब-बेस्ड करण्यात आली. आता २०२५-२६ मध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुधारणा करून ती अधिक सुरक्षित, आधुनिक आणि वापरकर्ता-अनुकूल बनविण्यात आली आहे. या बदलामुळे कर्मचारी कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही वेळी आपल्या पीएफ खात्याची अद्ययावत माहिती सहज पाहू शकतात. कर्मचाऱ्यांच्या मासिक वर्गणीची नोंद, निधीतील व्यवहार, व्याज परिगणना, वार्षिक लेखे तयार करणे तसेच खात्यांशी संबंधित विविध प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे केवळ कामकाजाची गती वाढली नसून आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकताही अधिक बळकट झाली आहे. नव्या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती थेट कर्मचाऱ्यांच्या मोबाईलशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी लेखे मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापूर्वी वित्त विभागाकडून छापील विवरणपत्रांचे वितरण केले जात होते. मात्र आता ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि प्रशासकीय प्रक्रिया यामध्ये मोठी बचत होणार आहे. ३१ मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत २,६७७ प्राथमिक शिक्षक आणि ७८४ इतर कर्मचारी अशा एकूण ३,४६१ कर्मचाऱ्यांना या संगणकीकृत प्रणालीचा लाभ मिळत आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीशी संबंधित सर्व माहिती क्लाउड सर्व्हरवर सुरक्षित ठेवण्यात आली असून डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600