जिल्हा

ज्येष्ठाची सोन्याची चेन लुटणारी टोळी जेरबंद

ज्येष्ठाची सोन्याची चेन लुटणारी टोळी जेरबंद
ज्येष्ठाची सोन्याची चेन लुटणारी टोळी जेरबंद फोटो: ठाणे वैभव
कल्याण: मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला करून त्यांची सोन्याची चेन लुटणाऱ्या टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. आरोपींकडून लुटलेली सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा परिसरात राहणारे 64 वर्षीय सुगंध मंगल्या म्हात्रे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. 24 मे रोजी पहाटे सुमारे 5.20 वाजण्याच्या सुमारास ते गावदेवी जेट्टी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना दोन युवकांनी त्यांच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून गळ्यातील सुमारे 26 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून आरोपी फरार झाले. घटनेची नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या नेतृत्वाखाली विष्णुनगर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला. आरोपींनी आधी परिसराची रेकी करून नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात दोन प्रौढ आणि सहा अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चिंतन नंदा (20), मोहित जाधव (19) आणि चोरीचा माल विक्रीस मदत करणारा स्वप्नील भोईर (27) यांना अटक करण्यात आली. सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 25.280 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान टोळीतील बहुतांश सदस्य 16 ते 18 वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. हे आरोपी ज्येष्ठ नागरिकांची रेकी करून त्यांना निर्जन ठिकाणी गाठत आणि लुटमार करत असल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना मॉर्निंग वॉकदरम्यान सतर्क राहण्याचे, निर्जन ठिकाणी एकटे जाणे टाळण्याचे तसेच सोन्याचे दागिने घालून फिरण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवून त्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) गहिनीनाथ गमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे आणि विष्णुनगर पोलिसांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600