महाराष्ट्र
अजस्त्र बॉयलर वाहून नेणारा पुलर उलटला
कल्याण : अंबरनाथ एमआयडीसीतून नाशिककडे जाणाऱ्या अजस्त्र बॉयलरचा पुलर उलटून अपघात झाल्याची घटना कल्याण पत्रीपुल परिसरात घडली. रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिममेकडे येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून त्यामुळे पत्रीपुल परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली.
अंबरनाथ येथून ओडिसाला जाण्यासाठी हा अजस्त्र बॉयलर निघाला होता. त्याचवेळी कल्याणच्या पत्रीपुलावरून दुर्गाडीकडे जात असताना त्या चौकातच हा पुलर उलटला. मात्र सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्त्यांवर फारशी वर्दळ आणि वाहतूक नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
दरम्यान या उलटलेल्या पुलरमुळे पत्रीपुलावरील कल्याणकडे येणाऱ्या बाजूची वाहतूक प्रभावित झाली आहे. तर क्रेनच्या साहाय्याने हा उलटलेला पूलर बाजूला करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत होते. सकाळी साडे आठ नंतर हा पुलर बाजूला करण्यात यश आले. परंतु या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता.
दरम्यान चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा उलटलेला पुलर उचलण्यात आणि अजस्त्र बॉयलर बाजूला काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ शकली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600