महाराष्ट्र

पुणे आणि भिवंडी बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू!

पुणे आणि भिवंडी बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू!
पुणे आणि भिवंडी बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू! फोटो: ठाणे वैभव
मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली! मुंबई: नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा उच्छाद सुरु असल्याचे समोर आले आहे. पुणे आणि भिवंडी हे नोटा छापण्याचे केंद्रबिंदू झाले असल्याची लेखी उत्तरामध्ये कबुली आज (16 जुलै) विधानसभेमध्ये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरामध्ये दिली. या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी माहिती देताना राज्यात पुण्यात आणि भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे राज्यांमध्ये बनावट नोटांचे जाळ रोखण्याचे आव्हान असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 पासून आतापर्यंत तब्बल 273 गुन्हे हे बनावट नोटांसंदर्भात दाखल झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई करताना 566 जणांना अटक केली आहे. हे गुन्हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि भिवंडी या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत झालेल्या कारवाईमध्ये पोलिसांकडून एक कोटी चाळीस लाख किमतीच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असल्याचा स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600