जिल्हा

विकास कामांना स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडीला ब्रेक लावा

भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची ठाणे : राज्यातील विकास कामांना आघाडीच्या सरकारने ब्रेक लावला होता. त्यावेळचे सरकार हे राज्याला पाठीमागे घेऊन जाणारे सरकार होते, त्यांना ठाणेकरांनी ब्रेक लावावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केले. ठाणे महापालिका हद्दीतील चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचाराकरिता शहरातील बुद्धिजीवी मतदारांचा मेळावा मो. ह. विद्यालय येथे घेण्यात आला. याप्रसंगी, खा.नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक, आ.ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाइं (आ) भास्कर वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधुन जे.पी.नड्डा यांनी ठाण्यातील गुरुदवारामध्ये तसेच ठाणेकरांचे ग्रामदैवत श्री कौपिनेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटले की घराणेशाही, तुष्टीकरण होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालुन राजकारणाची परिभाषा बदलुन टाकली आहे. या आधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा, विरोधक कमजोर होते. पण नरेंद्र मोदींनी मजबुत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आल्याचे सांगून जे.पी.नड्डा यांनी, हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाजासमाजात फूट पाडतात, असे नड्डा म्हणाले. याउलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांनाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात...जग आमच्या असहमतीचाही आदर करत आहे. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला आहे. दुसरीकडे विरोधक एनडीएचा व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले. देशातील आणि राज्यातील विकास कामे आणि विविध योजनांचा उहापोह नड्डा यांनी केला. करोडो युवांचा हा भारत देश आहे. सबका साथ सबका विकास करीत असताना पदपथावरील प्रत्येक गरीबासाठी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिनच्या सरकारमुळे विकास धरतीवर उतरला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ते अटल सेतु असे सर्वच प्रकल्प त्यांनी रोखले. लाडकी बहिण योजनेविरोधातही ते न्यायालयात गेले. ही मंडळी आघाडी म्हणवतात आणि पिछाडीचे काम करतात. म्हणुन २० नोव्हेंबरला यांना रोखण्याचे काम करून घरी बसवा. असे आवाहन नड्डा यांनी केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600