जिल्हा

मुंबई-नाशिक महामार्गावर चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावर चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई-नाशिक महामार्गावर चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा फोटो: ठाणे वैभव
कंटेनर उलटला; नागरिक त्रस्त ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी सकाळी कंटेनर ट्रक उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे महामार्गावरील दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली. या अपघातामुळे महामार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ही घटना रविवारी सकाळी आर.के. लॉजिस्टिक कंपनीच्या कंटेनर ट्रकचा चालक वाहनावरील ताबा गमावल्याने घडली. ट्रक महामार्गावर आडवा पडल्यामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक संपूर्णपणे विस्कळीत झाली. अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये कोणतेही ज्वलनशील साहित्य नसल्याने मोठा अनर्थ टळला, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसोबतच स्थानिक प्रशासन व यांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी ट्रक हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर कंटेनर ट्रक रस्त्यावरून बाजूला करण्यात आला. यानंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली. या अपघातात कंटेनर ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी वेळेत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांना शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600