जिल्हा

रॅपिडो बाईक चालकाचा तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

कल्याण : कल्याणमध्ये रॅपिडो बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी या तरुणाला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याण पश्चिममध्ये एका तरुणीने जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल बुक केली. सिंधीगेट परिसरामध्ये असलेल्या पोलीस लाईनमध्ये बाईकवरून हा रॅपिडो चालक त्या तरुणीला अंधारात घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणीने आरडा ओरड करत स्वतःची सुटका करत पळ काढला. यावेळी स्थानिक नागरिकांनी रॅपिडो चालकाला चोप दिला.
या प्रकरणी महात्मा फुले चौक  पोलिसांनी सिद्धेश परदेशी या 19 वर्षीय रपिडो चालकाला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600