महाराष्ट्र
श्री राम मंदिरची प्रतिकृती असलेली श्री राम मंदिराची रथयात्रा
अयोध्येच्या श्री राम मंदिरची प्रतिकृती असलेली श्री राम मंदिराची रथयात्रा अंबरनाथ येथील ग्रीन सिटी येथून सुरुवात करत अंबरनाथ येथील शिवगंगा नगरपर्यंत काढण्यात आली होती. यावेळी ग्रीन सिटी येथे श्री रामची आरती करून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले-पाटील, कल्याण जिल्हासरचिटणीस अभिजीत करंजुले, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, शिवसेना उत्तर भारतीय शहर अध्यक्ष प्रमोद चौबे आदी यावेळी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600