महाराष्ट्र
नवी मुंबईत १८५ पोलीस शिपाई पदांची भरती
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती करण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रभरातून उमेदवारांनी अर्ज भरले असून तब्बल एकूण 5984 भरती परीक्षा देणार आहेत. सदर भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय परेड मैदान कळंबोली येथे 19 जून ते 26 जून पर्यंत पार पडणार आहे. पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी डिजीटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600