काल रात्री ३च्या सुमारास हा बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी घोडबंदर मार्गांवरील इडन वूड या गृहनिर्माण संकुलाच्या परिसरात आल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या संकुलाचे प्रवेशद्वार उंच असल्याने त्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही. तो दुसऱ्या बाजूने पार्किंगच्या भागात घुसला. तेथे त्याने आवारात असलेल्या लिली नावाच्या श्वानावर झडप घालून त्याला जबड्यात पकडले, परंतु याच संकुलामधील बगिरा नावाचा दुसरा कुत्रा लिलीच्या मदतीला धावून आला. त्याने भुंकून-भुंकून बिबट्याच्या मनात भीती निर्माण केली. संकुलाच्या भिंतीवरून उडी मारण्यासाठी बिबट्या प्रयत्न करत होता. त्याने तसा प्रयत्न करताच बिबट्याच्या जबड्यातून लिलीची सुटका झाली. अखेरीस बिबट्याने कशीबशी भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली. या हल्ल्यात लिली जबर जखमी झाली आहे.
भरवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
जिल्हा
बिबळ्याचा भरवस्तीत संचार; इडनवुडमध्ये मध्यरात्री थरार!

फोटो: ठाणे वैभव
कुत्र्यांची अनोखी दोस्ती; एकाचे वाचवले प्राण
ठाणे : ही दोस्ती तुटायची नाय या गाण्याची प्रचिती काल मध्यरात्री ठाण्यातील खेवरा सर्कल परिसरातील इडनवुड गृहसंकुलात दोन श्वानांच्या बिबट्याशी झालेल्या झटापटीत आली. बिबट्याने एका श्वानास उचलून नेण्याचा प्रयत्न केला, पण जवळच असलेल्या दुसऱ्या श्वानाने भुंकत पाठलाग केला. त्यामुळे बिबट्याने जखमी श्वानाला तसेच टाकून पलायन केले.
काल रात्री ३च्या सुमारास हा बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी घोडबंदर मार्गांवरील इडन वूड या गृहनिर्माण संकुलाच्या परिसरात आल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या संकुलाचे प्रवेशद्वार उंच असल्याने त्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही. तो दुसऱ्या बाजूने पार्किंगच्या भागात घुसला. तेथे त्याने आवारात असलेल्या लिली नावाच्या श्वानावर झडप घालून त्याला जबड्यात पकडले, परंतु याच संकुलामधील बगिरा नावाचा दुसरा कुत्रा लिलीच्या मदतीला धावून आला. त्याने भुंकून-भुंकून बिबट्याच्या मनात भीती निर्माण केली. संकुलाच्या भिंतीवरून उडी मारण्यासाठी बिबट्या प्रयत्न करत होता. त्याने तसा प्रयत्न करताच बिबट्याच्या जबड्यातून लिलीची सुटका झाली. अखेरीस बिबट्याने कशीबशी भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली. या हल्ल्यात लिली जबर जखमी झाली आहे.
भरवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
काल रात्री ३च्या सुमारास हा बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी घोडबंदर मार्गांवरील इडन वूड या गृहनिर्माण संकुलाच्या परिसरात आल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या संकुलाचे प्रवेशद्वार उंच असल्याने त्याला आतमध्ये प्रवेश करता आला नाही. तो दुसऱ्या बाजूने पार्किंगच्या भागात घुसला. तेथे त्याने आवारात असलेल्या लिली नावाच्या श्वानावर झडप घालून त्याला जबड्यात पकडले, परंतु याच संकुलामधील बगिरा नावाचा दुसरा कुत्रा लिलीच्या मदतीला धावून आला. त्याने भुंकून-भुंकून बिबट्याच्या मनात भीती निर्माण केली. संकुलाच्या भिंतीवरून उडी मारण्यासाठी बिबट्या प्रयत्न करत होता. त्याने तसा प्रयत्न करताच बिबट्याच्या जबड्यातून लिलीची सुटका झाली. अखेरीस बिबट्याने कशीबशी भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली. या हल्ल्यात लिली जबर जखमी झाली आहे.
भरवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600