जिल्हा

दहा फूट लांबीच्या अजगराची सुटका

दहा फूट लांबीच्या अजगराची सुटका
दहा फूट लांबीच्या अजगराची सुटका फोटो: ठाणे वैभव
ठाणे : रविवार 22 जून रोजी संध्याकाळी सात वाजता पुनर्वसु फाउंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी ठाण्यातील कैलास नगर येथे पत्र्याखाली वेटोळे करून बसलेल्या नऊ ते दहा फूट लांबीच्या अजगराची सुटका करून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले. कैलास नगर, आयटीआय परिसरातून एका नागरिकाने फोन करून माहिती दिली की एक भला मोठा साप त्यांच्या परिसरात पत्र्याखाली वेटोळे मारुन बसला आहे. सर्पमित्र अतिथ आणि त्यांचा सहकारी मित्र तुषार चव्हाण यांना घेऊन घटनास्थळी पोहचले तिथे जाऊन पाहणी केली असता लक्षात आले की 9 ते 10 फुट लांबीचा भारतीय अजगर जातीचा साप पत्र्याखाली जाऊन बसला होता अतिथ व तुषार यांनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरु करत सर्व पत्रे काढून कचरा काढला. त्यावेळी तिथे सापाच्या फुत्काराचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अतिथ आणि तुषार यांनी क्षणाचा विलंब न करता 9 ते 10 फूट लांबीच्या सापाला सुरक्षितरित्या पकडले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600