जिल्हा

कोपरखैरणे वासिय वाहतूक कोंडीने नागरिक बेजार

डी मार्ट सर्कलपासून ३०० मिटर रस्ता नो पार्किंग झोन करण्याची मागणी नवी मुंबई : कोपरखैरणे डी मार्ट सर्कल ते यशवंतराव चव्हाण शाळेपर्यंतच्या दोन्ही बाजूला सम विषम पार्किंगचे नियम सध्या लागू आहेत, परंतु सकाळी ९ ते दुपारी १ व संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. त्याचवेळी रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांनामुळे वाहतुक कोंडी उद्भवत आहे. त्यामुळे डिमार्ट सर्कल ते ३०० मीटर पर्यंतचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून करण्यात यावा, अशी मागणी भारतीय मराठा महासंघ ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. कोपरखैरणे विभागात वाहनांच्या पार्किंगकरिता रेल्वे स्थानकाबाहेर एकमेव पे अँड पार्कची व्यवस्था उपलब्ध आहे. संपूर्ण भागात इतर कोणत्याच ठिकाणी वाहनतळ उपलब्ध नाही. तसेच बहुतांशी गृसंकुलातील नागरिक, ट्रान्सपोर्ट व्यवयसायिक रस्त्यावरच सरार्स वाहने उभी करीत आहेत. कोपरखैरणे से.२२ येथून हॉटेल ब्ल्यू डायमंड ते कोपरखैरणे तीन टाकीपर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. हा रस्ता मुख्य असून वाशी, एपीएमसीमधील वाहनचालकाना मुख्य रस्ता आहे. हा रस्ता घसणोली, महापे, ऐरोली, मुलंड यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या भागात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तीनटाकी ते डी मार्ट पर्यंतच्या रस्त्यावर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा उभ्या असतात. तसेच पुढे कोपरखैरणे बस स्थानक, माथाडी रुग्णालय या परिसरात देखील वाहनांची पार्किंग होत असते. या परिसरातलगत शाळा, महाविद्यालय असल्याने या ठिकाणी वाहनांना बरोबर पादचाऱ्यांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात असते. मात्र चिंचोली रस्त्यावर दुतर्फा पार्किंग व रस्त्यावर वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना गर्दीतून वाट काढणे देखील जिकरीचे होते. सध्या येथे सम-विषम पार्किंग नियम लागू आहे, परंतु तरीही येथून येणाऱ्या जाणाऱ्या मोठी वाहने, बस, ट्रक इत्यादी वाहनांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे डी मार्ट सर्कल पासून २०० ते ३०० मीटरचा रस्ता जो यशवंतराव शाळेपर्यंतच्या रस्त्यालगत नो पार्कींग झोन असावा अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600