जिल्हा
निवृत कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीच्या फरकाची रक्कम मिळणार
निवृत कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीच्या फरकाची रक्कम मिळणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठामपा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. एच. पाटील व पदाधिकारी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी व ग्रॅच्युईटीच्या फरकाचे शिल्लक दोन हप्ते मिळावेत, यासाठी २० जानेवारी २०२६ रोजी आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
१ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी शिल्लक आहेत ती फेब्रुवारी २०२६ पर्यंत देण्यात येतील असे सांगण्यात आले होते परंतु अद्याप देणी देण्यात आली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास या चर्चेत आणून देण्यात आले. आयुक्तांनी ग्रॅच्युइटीच्या फरकाचे दोन हप्ते फेब्रुवारी २६ पर्यंत तर जास्तीत जास्त मार्च २०२६ पर्यंत नक्की देण्यात येईल असे सांगितले. संघटनेचे सचिव श्री. पटेल यांनी संघटनेमध्ये अपंग कर्मचारी असल्याने त्यांना प्रत्येक वेळी भेटायला जमत नसल्याचे सांगितले त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. पी. एच. पाटील यांच्यासह सचिव श्री. पटेल, खजिनदार संजय माने, उदय पंडीत, श्रीमती वालावलकर, विश्राम कुबल, दत्ता खाडे, श्री.भानुशाली, प्रकाश बनसोडे उपस्थित होते
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600