जिल्हा

ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग

ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग
ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरुज्जीवनाला वेग फोटो: ठाणे वैभव
संरक्षक भिंतीच्या कामाचा शुभारंभ ठाणे: ठाण्यातील उथळसर परिसरातील ऐतिहासिक जोगिला तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला आता नवसंजीवनी मिळाली असून तलावाभोवती संरक्षक भिंत उभारणीच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना गटनेते पवन कदम आणि खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, स्थानिक नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार खासदार नरेश म्हस्के यांच्या खासदार निधीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सांगितले की, जोगिला तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत सुमारे ३५० कुटुंबे बाधित झाली होती. त्यापैकी २७० रहिवाशांना पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. तलावातील अतिक्रमणे हटवल्यानंतर तलावाचा विस्तार करण्यात येणार असून परिसराचा विकास आधुनिक पद्धतीने केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत तलाव परिसरात खुला रंगमंच, जिम, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तलावाची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600