व्हिडिओ

शिक्षण खाते नापास !

राज्य शासनातर्फे चालवण्यात येणाऱ्या राशा शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारे एक सर्वेक्षण अलिकडेच करण्यात आले होते. त्यातून निष्पन्न झालेल्या अहवालातील माहिती धक्कादायक होती. अनेक मुलांना वजा-बाकी आणि मोठ्या मुलांना गुणाकार-भागाकार करता येत नसल्याचे उघडकीस आले होते. जी शोचनीय अवस्था गणिताबद्दल होती तीच भाषाविषयी. सहावी-सातवीतील मुलांना एक वाक्य सलग वाचता येत नसल्याचे या पहाणीत आढळून आले होते. एकूणच जिल्हा परिषद शाळा असोत की महापालिका संचलित शाळा, तेथील शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. हेच हा अहवाल सांगून गेला. सरकारी (अनुदानित) शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. हा अहवाल आठवायचे कारणे असे की सरकारने शिक्षणाचा अधिकार (आरटीई) ही योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खाजगी शाळांत शिकू पहाणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल वर्गातील मुलांना पुन्हा सरकारी शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे. https://www.youtube.com/watch?v=6YnysssP1ok

संबंधित बातम्या

प्रतिक्रिया (Comments)

अमित भोसले
२ तासांपूर्वी

मेट्रोमुळे खरोखरच वेळ वाचणार आहे. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.

सीमा देशपांडे
५ तासांपूर्वी

घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकचा त्रास खूप वाढलाय. मेट्रो लवकरात लवकर सुरू व्हावी.

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600