जिल्हा

ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती

* पहिल्या टप्प्यातील कामासाठी १४०० रुपये कोटी रुपयांची निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात * उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणेकरांना भेट

ठाणे : केंद्र आणि राज्याने मंजुरी दिलेल्या `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो'च्या (वर्तुळाकार मेट्रो) पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १४०० कोटी रुपयांची निविदा मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहितीही श्री.म्हस्के यांनी दिली आहे. १२,२०० कोटींची मंजूरी असलेल्या हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा आहे. २६ कि.मी. जमिनीवरून तर 3 कि.मी. जमिनी खालून (भूमिगत) ही रेल्वे धावणार आहे. याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत. एकूण २२ स्थानके उन्नत तर २ स्थानके भूमिगत असणार आहेत. भूमिगत असलेली स्थानके ही जुने ठाणे रेल्वे स्थानक आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक यांना जोडणारी असणार आहे. भूमिगत रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते. भूमिगत रेल्वेमुळे कोणत्याही इमारती अथवा बांधकामांस बाधा किंवा अडचण निर्माण होणार नसल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १४०० कोटी रुपयांची निविदा मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्पामध्ये वागळे इस्टेट, रोड नं. 22, लोकमान्य नगर, पोखरण रोड नं.1, पोखरण रोड नं.2, ग्लॅडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्टेशन या परिसरातून ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. सीआरझेडच्या अडचणीमुळे बाळकुम नाका ते रायलादेवी मार्गाची निविदा तीन महिन्यांनी निघणार आहे. वडवली, कावेसर येथे `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' प्रकल्पाच्या डेपोचे सर्व्हेक्षण सुरु आहे. लोकांच्या काही तक्रारी असून त्या दुर करुन डेपो बांधणीच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' ची स्थानके अत्याधुनिक आणि आयॉनिक करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार ही स्थानके बांधण्याकरता नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. काम सुरु असतांना विविध शासनाचे विभाग, ठाणे महापालिका, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण, महानगर गॅस, महावितरण या संदर्भातील अडचणींवर मात करण्याकरता सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो' कामाचे लवकरच भूमिपुजन करण्यात येऊन ठाणेकर जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक चांगली भेट देणार आहेत. बैठकीस प्रकल्प संचालक राजीव त्यागी, मुख्य प्रकल्प अधिकारी सुनिलकुमार गर्ग, व्यवस्थापक प्रविण पापोळकर आदी अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600