जिल्हा

सदानंद थरवळ यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

सदानंद थरवळ यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश
सदानंद थरवळ यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : बुधवारी सकाळी २७ गाव कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेला दिलेल्या या धक्क्यानंतर दुपारी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजीत थरवळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अभिजीत थरवळ मागील १५ वर्षापासून राजकारणात आहेत. ते युवा सेनेचे पदाधिकारी होते. कल्याण डोंबिवली पालिकेची मागील निवडणूक त्यांनी टिळकनगर प्रभागातून भाजप उमेदवार राजन आभाळे यांच्या विरूध्द लढवली होती. त्यावेळी तीन मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत यांनी आपले राजकीय, सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. जुना टिळकनगर प्रभाग आता डोंबिवली जीमखाना, शिवमंदिर, गोग्रासवाडी, टिळक रस्ता परिसरात विस्तारला आहे. या भागात यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य होते. पण गेल्या काही दिवसापूर्वी या प्रभागात आपले नशीब अजमावणारे शिवसेना शिंदे गटाचे महेश पाटील, सायली विचारे, डाॅ. सुनीता पाटील भाजपमध्ये दाखल झाले. आता भाजपच्या या पॅनलमध्ये निवडून यायचे असेल तर भाजपशी जवळिक केल्याशिवाय पर्याय नाही. या भागातून अभिजीत थरवळ यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यावेळीही त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पालिकेतील आपला प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांनी बुधवारी आपल्या वेगळ्या विचाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे समजते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600