जिल्हा

२१४ सदनिकांची विक्री; ७४५ कोटींच्या गृहकर्जाचे प्रस्ताव!

२१४ सदनिकांची विक्री; ७४५ कोटींच्या गृहकर्जाचे प्रस्ताव!
२१४ सदनिकांची विक्री; ७४५ कोटींच्या गृहकर्जाचे प्रस्ताव! फोटो: ठाणे वैभव
क्रेडाई-एमसीएचआयचे गृहप्रदर्शन यशस्वी ठाणे: क्रेडाई-एमसीएचआयने ठाण्यात आयोजित केलेल्या गृह प्रदर्शनास २९,१६३ नागरिकांनी भेट दिली. तर २१४ ग्राहकांनी सदनिका खरेदी केल्या. या सदनिकांसाठी बँका तसेच वित्त संस्थांकडे ७४५ कोटी रुपयांच्या गृह कर्जाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. यंदा ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ठाणे शहर तसेच परिसरातील ४० हून अधिक प्रसिद्ध विकसकांनी त्यांच्या गृहप्रकल्पांचे स्टाॅल प्रदर्शनात मांडले होते. याशिवाय, १० हून अधिक राष्ट्रीयकृत बँका आणि गृह वित्त पुरवठादार संस्थांसह बांधकाम क्षेत्रासंंबंधी संस्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात ३० लाखांपासून ३ कोटींपर्यंतच्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. या ठिकाणी कार्यालयांच्या वास्तुचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. ठाण्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, यंदाही प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोचता आले, याचा आनंद वाटत असल्याचे प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. या प्रदर्शनात अनेक वैशिष्टयपूर्ण, उत्तम जीवनशैली आणि परवडणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनाला भेट देऊ शकलेले नाहीत, अशा ग्राहकांनी आवर्जून इंटरनेटवरून www.credaimchi.com या वेबसाईटवर प्रदर्शन पाहावे, असे सचिव मनिष खंडेलवाल यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना स्वप्नातील घर मिळवून देऊ शकलो, याचा आनंद वाटतो. घरखरेदीसाठी इच्छूकांनी चांगला प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून घरखरेदीसाठी इच्छूक शेकडो नागरिकांनी घरांची माहिती घेतली असून, ते लवकरच घर पसंत करतील. या प्रदर्शनाला भेट देणे शक्य झालेले नाही अशा नागरिकांना क्रेडाई-एमसीएचआयच्या वेबसाईटवर पुढील तीन महिने प्रदर्शन पाहता येईल, अशी माहिती क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. यंदा 'मोस्ट इनोव्हेटिव्ह बॅण्ड कम्युनिकेटर ऑफ द इयर' म्हणून रुस्तमजी ग्रूपला, बेस्ट डेब्यूट स्टॉलसाठी एल ॲण्ड टी रिॲलिटी, बेस्ट एचएफसी स्टॉल म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रला प्रथम, तर यूनियन बँक ऑफ इंडियाला द्वितीय पुरस्कार देण्यात आला. बेस्ट कन्झ्युमर अवेअरनेस इनिशिएटिव्ह फॉर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी गृहम हौसिंग फायनान्सला गौरविण्यात आले. तर नारंग रिॲलिटी ॲण्ड कोर्टयार्ड रिअल इस्टेट यांनी बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल म्हणून बाजी मारली. बेस्ट डिझाईन स्टॉलसाठी प्रथम क्रमांक विहंग ग्रूप आणि द्वितीय क्रमांक एकत्व ग्रुपला मिळाला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600