महाराष्ट्र

संजय शिरसाट यांनी स्वीकारला सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार

नवी मुंबई : आमदार संजय शिरसाट यांनी सिडको भवन येथे 19 सप्टेंबर 2024 रोजी सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक आणि सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, हे उपस्थित होते. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संजय शिरसाट म्हणाले, “राज्याच्या विकासामध्ये सिडकोने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नगर नियोजन व विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना शहर, महागृहनिर्माण योजना इ. महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. त्याचप्रमाणे, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासही आपले प्राधान्य असणार आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्याचे सिडकोचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होणार आहे,”

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600