जिल्हा
कल्याणमधील ४१ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
कल्याणमधील ४१ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर
फोटो: ठाणे वैभव
पुढील पाच वर्षांसाठी संरपच सोडत
कल्याण: ग्रामपंचायतीत सरपंच होण्याचा मान कोणाला मिळणार याकडे डोळे लावून बसलेल्या कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी गर्दी केली होती.
मंगळवारी प्रांताधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण, गटविकास अधिकारी संजय भोय तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रत्येक ग्रामपंचायतीमधून काही इच्छुकांनी हजेरी लावली होती.
कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची सोडत पार पडली. चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या या सोडतीत शासनाच्या निकषानुसार अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित ग्रामपंचायतीची लोकसंख्येच्या निकषानुसार निवड करण्यात आली. यामध्ये तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यामध्ये आणे-भिसोळ आणि कांबा अनुसूचित महिला, वासुद्री-अनुसुचित जाती. तसेच अनुसचित जमातीसाठी ग्रामपंचायत जांभूळ-मोहिली अनुसूचित जमाती महिला, वाहोली-अनुसूचित जमाती महिला, काकडपाडा-अनुसुचित जमातीसाठी आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ग्रामपंचायत- दहिवली, निंबवली, वरप, पळसोली, दहागांव, नागरिकांचा मागास प्रवर्ग - चवरे, उशिद आराळे, केळणी कोलम, म्हसकळ अनखर, रुंदे आंबिवली, वसत शेलवली, सर्वसाधारण महिला ग्रामपंचायत आपटी मांजर्ली, गेरसे, गुरुवली, घोटसई, कोसले, मामणोली, म्हारळ, नडगाव दानबाव, नांदप, राया ओझर्ली, रायते पिंपळोली, वेहळे. तर सर्वसाधारण ग्रामपंचायतसाठी बापसई, बेहेरे, फळेगाव, कुंदे, खोणी वडवली, मानिवली, गोवेली रेवती, पोई, रोहण अंताडे, सांगोडे, उतने चिंचवली, वडवली-शिरढोण या ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत काढण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600