जिल्हा

स्मार्ट प्रकल्पातंर्गत सुलभतेसाठी ठाणे, विरार स्थानकांची निवड

ठाणे : ‘बुलेट ट्रेन’च्या ‘स्मार्ट प्रकल्पांतर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) स्थानकांभोवती सुलभता सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार यासह गुजरातमधील साबरमती आणि सुरत या चार स्थानकांची निवड राज्य सरकारने केली आहे. मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन कॉरिडॉर’वरील प्रत्येक स्थानकाच्या डिझाइनमध्ये ते ज्या शहरात येत आहे, त्या शहराच्या भावनेचे प्रतिबिंब उमटणार आहे. यामुळे स्थानिक जनतेशी तत्काळ संपर्क निर्माण करेल आणि भारतातील पहिल्या हाय-स्पीड प्रणालीविषयी अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करेल. रेल्वे, मेट्रो, बस, टॅक्सी आणि ऑटो अशा इतर माध्यमांशी एकरूप होऊन स्थानकापर्यंत आणि ये-जा करण्यासाठी अलाइनमेंटवरील स्थानके ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केली जातील. अशा ‘इंटरफेस’मुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, सुलभता वाढेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही प्रोत्साहन मिळेल,ज्यामुळे आपल्या शहरांमध्ये गर्दी आणि उत्सर्जन कमी होईल.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600