जिल्हा
कुर्ला स्टेशनदरम्यान लोकलला भीषण आग
कुर्ला स्टेशनदरम्यान लोकलला भीषण आग
फोटो: ठाणे वैभव
डब्बा जळून खाक; सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबई: कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान आज ट्रॅकवर उभा असलेल्या लोकलला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळासाठी बंद करावी लागली होती.
लोकल ट्रेनमधून पडल्याने अनेक अपघात होतात, त्यामुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन, प्रवासी अपघात टाळण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, तरीही काही घटना घडतात.
कुर्ला आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान आज गुरुवारी ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकलला आग लागल्याने मध्य रेल्वेच्या स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प होती, कुर्ला स्टेशनच्या पुढे काही वेळेसाठी गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने तत्काळ लोकल ट्रेनला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल अर्ध्या तासाने आग विझवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते. दरम्यान, या लोकलमध्ये केवळ कचरा असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आग भडकल्याने ट्रेनचा एक डब्बा जळून खाक झाला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600