जिल्हा

शहापूरला मिळणार भातसा नदीतून एक दशलक्ष घनमीटर पाणी

शहापूरला मिळणार भातसा नदीतून एक दशलक्ष घनमीटर पाणी
शहापूरला मिळणार भातसा नदीतून एक दशलक्ष घनमीटर पाणी फोटो: ठाणे वैभव
* नगरपंचायतीच्या पाणी आरक्षणाला शासनाचा हिरवा कंदील * आ.किसन कथोरेंसह उपनगराध्यक्ष विजय भगत व हरेश पष्टे यांच्या प्रयत्नांना यश शहापूर: शहापूर शहराच्या पाणी प्रश्नावर दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत शहापूर नगरपंचायतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून अतिरिक्त पाणी आरक्षणास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ५ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेसाठी आमदार किसन कथोरे यांनी जलसंपदा विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून अतिरिक्त पाणी आरक्षण फाईल जलसंपदा सचिव दीपक कपूर व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांचेकडून २४ तासात सही घेऊन विषय मार्गी लावला.यासाठी शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय भगत व नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती हरेश पष्टे यांनीही सातत्याने पाठपुरावा करत शासन दरबारी व आमदार किसन कथोरे यांच्याकडे हा विषय मांडला होता.यासाठी नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक हे देखील वेळोवेळी पाठपुरावा व सहकार्य करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे. शासनाच्या या निर्णयानुसार शहापूर नगरपंचायतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून १.००२ दशलक्ष घनमीटर इतक्या प्रमाणात वाढीव पाण्याचा मोठ्या प्रमाणातील पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी शहापूर नगरपंचायतीसाठी १.१८६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर असून त्याचा वापर सुरू आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन सन २०५४ पर्यंतच्या लोकसंख्येचा अंदाज विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. शहापूर शहरात गेल्या काही वर्षांपासून वाढती लोकसंख्या, शहरी विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे भविष्यातील पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. या मंजुरीमुळे शहरातील घरगुती पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान शासनाने या मंजुरीस काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार संबंधित संस्थेने पाणी वापराबाबत आवश्यक करारनामा करणे, पाणीपट्टीचे नियम पाळणे तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता योग्य राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच मंजूर करण्यात आलेल्या पाणी आरक्षणापैकी प्रत्यक्ष पाणी उचल पाच वर्षांच्या आत सुरू न झाल्यास ही मंजुरी आपोआप रद्द होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान भातसा नदीतून वाढीव पाणी आरक्षण मिळाल्यामुळे शहापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेस मोठा आधार मिळणार असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. भातसा नदीतून वाढीव पाणी आरक्षणास शासनाची मंजुरी मिळाल्याने शहापूर शहराच्या भविष्यातील पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी शासनाचा हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.नगरपंचायत स्तरावरही आम्ही आवश्यक प्रस्ताव व पाठपुरावा करत होतो. या सर्व प्रयत्नांना अखेर यश मिळाले याचा आनंद आहे, असे शहापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी सांगितले. यासंदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ.किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. आमदार किसन कथोरे यांनी जलसंपदा विभागाकडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी भातसा नदीतून अतिरिक्त पाणी आरक्षण फाईल जलसंपदा सचिव दिपक कपूर व जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून स्वतः सोबत येऊन २४ तासांत सही घेऊन विषय मार्गी लावला. भविष्यात शहापूर शहरातील नागरिकांना पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे, असे बांधकाम समिती सभापती हरेश पष्टे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600