जिल्हा

शरद पवार गुरुवारी मुंब्य्रात

जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरणार ठाणे: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंब्य्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत खारीगाव रेतीबंदर ते कौसा स्टेडीअम येथील निवडणूक कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. आव्हाड हे शरद पवार यांचे विश्वासू नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही आव्हाड यांनी पवार यांची साथ सोडली नाही. उलट अधिक आक्रमकपणे त्यांनी पक्षाची भूमिका पुढे नेण्याचे काम केले. अशा आपल्या कट्टर पठ्ठयाला आशिर्वाद देण्यासाठी शरद पवार मुंब्य्रात येणार आहेत. सकाळी दहाच्या सुमारास खारीगाव रेतीबंदर येथून मिरवणूक काढत कौसा येथील निवडणूक कार्यालयापर्यंत हजारो कार्यकर्ते समर्थकांच्या सोबतीने उमेदवारी अर्ज भरायला जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600