जिल्हा

महाविकास आघाडीसाठी शरद पवार आग्रही

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची माहिती ठाणे: ठाकरे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्यानंतर महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असताना आघाडीसाठी शरद पवार नेहमीच आग्रही राहतील आणि आग्रही आहेत तसेच ते प्रयत्नशीलही आहेत, अशी माहिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. मुंबईसह नागपूरमध्येही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले. मुंबई, ठाणे, नागपूर महापालिकेची निवडणूक उबाठा पक्षासाठी महत्वाची निवडणूक मानली जात असून ठाकरे गटाची ही अस्तित्वाची लढाई आहे. संजय राऊत यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र शरद पवार हे आघाडीसाठी आग्रही असल्याचे विधान केले आहे. पवार हे आघाडीसाठी नेहमीच आग्रही असतील आणि ते प्रयत्नशील देखील असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी बोलताना आव्हाड म्हणाले, संजय राऊत संदर्भात मला प्रश्न विचारू नका. आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आघाडी असावी कि नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. संजय राऊत हे थेट मोठ्या साहेबांशी बोलतात. उद्धव ठाकरे देखील मोठ्या साहेबांशी थेट तसेच जयंत पाटलांशी बोलतात. त्यांनी त्यांच्या स्तरावर या गोष्टी बघाव्यात. मात्र कार्यकर्त्यांची एवढीच इच्छा आहे, एक रहेंगे तो लढेंगे, बटेंगे तो कटेंगे अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600