जिल्हा

भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
भिवंडी ग्रामीणमधील शिवसेनेची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: ठाणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया राज्य शासन आदेशानुसार महसूल विभागाने सुरू केल्याने सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना ठाणे ग्रामीणमध्ये सुध्दा निवडणुका लक्षात घेऊन कशेळी शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा झाला. या ठिकाणी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना विविध पदांचे वाटप करीत मोर्चा बांधणी सुरू केली आहे. भिवंडी तालुक्यातील कशेळी शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या मेळावा कार्यक्रमास शिवसेना उपनेते निलेश सांबरे, अरूण पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख मदन नाईक, भिवंडी पश्चिम शहरप्रमुख शाम पाटील, दिलीप नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व त्या अंतर्गत शिवसेना सदस्य मोहीम सुद्धा सुरू केली आहे. या प्रसंगी कोनगांव, पिंपळास, काल्हेर, कशेळी, अनगांव अशा विविध गावातील युवकांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी भिवंडी शहर व ग्रामीण भागातील सक्रीय पक्ष कार्यकर्त्यांना विविध पदावर नियुक्त करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600